PostImage

P10NEWS

Aug. 27, 2024   

PostImage

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे* -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन


 

   

 

      मुंबई, दि.२६ : आदिवासी बांधवांना  मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केले.

 आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयाबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन येथे बैठक झाली.

या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे,आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुड, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे, पद्मश्री पोपटराव पवार, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. या गावांमध्ये रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. ही आदर्श गावे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या सबलीकरणाबरोबरच आत्मविश्वास वाढवताना मानक म्हणून काम करतील. आदिवासी बांधवांच्या  सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

     आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी 'के जी टू पी जी' पर्यंतचे उत्तम शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत. आदिवासी बांधवात शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी. यासाठी विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे  सहकार्य मोलाचे असणार आहे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    दरम्यान 'प्रधानमंत्री जनमन योजने'च्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतला. यासोबतच आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा या बांधवांकडे ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी दिले.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 5, 2024   

PostImage

सासूला सांभाळण्याची जबाबदारी सुनेचीच , हायकोर्टाचा निर्णय, दरमहा दहा हजार …


 

मुंबई, . सासू- सासरे आणि मुलगा यांचा भागीदारीमध्ये प्रिंटिंग व्यवसाय होता. आधी मुलगा वारला तर 2023 मध्ये वडील वारले. सासूबाईला मात्र सुनेकडून छळ सोसावा लागला. सुनेने मालमत्तेवर हक्क सांगितला. परंतु, उच्च न्यायालयाने हा हक्क नाकारला आणि सुनेनेच आता सासूला सांभाळले पाहिजे. तसेच दरमहा देखभाल खर्च दहा हजार रुपये दिलाच पाहिजे, असा निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप वी मारणे यांच्या न्यायालयाने दिलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाने सासू- सासऱ्यांनी मुलाच्या नावे केलेले गिफ्ट पुन्हा सासू-सासऱ्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. वसंत होळकर हे वडील आणि वैशाली वसंत होळकर असे सासू सासऱ्याचे नाव आहे. आई-वडिलांनी मुलगा समीर होळकर यांच्या नावे गिफ्ट डीड केले होते. त्या गिफ्ट डीडवर प्राधिकरणाने मुलगा आणि सुनेचा अधिकार असल्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणात उच्च न्यायालयाने हा

 

निर्णय रद्द केला आणि सुनेनेच सासूला सांभाळले पाहिजे. तसेच गिफ्ट डीड हे पुन्हा सासू- सासरे यांच्या नावे केले. तसेच दर महिनाकाठी सून प्रिया समीर होळकर हिने सासू वैशाली होळकर यांना दहा हजार रुपये देखभाल खर्च दिला पाहिजे, असा न्यायमूर्ती संदीप वी मारणे यांनी हा निकाल दिला. 4 मार्च रोजी न्यायालयाने हा निकाल जाहीर केलेला आहे. मालमत्तेवर सून हक्क सांगू शकत नाही: जेव्हा वडील हयात होते तेव्हा मुलाने आणि सुनेने आई-वडिलांच्या नावे असलेल्या भागीदारीच्या फॉर्ममधून जे उत्पन्न मिळाले त्यातून अनेक मालमत्ता खरेदी केल्या. त्या आधारावर त्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले; परंतु 2015 मध्ये मुलगा समीर होळकर याचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्जाच्या थकबाकीकरिता बँकेकडून तगादा लावण्यात आला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 4, 2024   

PostImage

भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर …


 

*मुंबई दि (प्रतिनिधी) निवडणुका येऊ घातल्या आहेत. अश्यावेळी आरक्षणावर जे पोट भरत आहेत अश्या गद्दार दलित व बौद्धांना प्रचार करण्यास आपल्या वस्तीत आल्यास त्यांच्या ढुंगणाचे वाभाडे काढा. असे आवाहन विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.*

 

शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रात मनुवादी शक्ती तोंड वर काढत आहे. वेगवेगळ्या उक्तीने प्रलोभने देऊन सत्तेत बसत आहे. भारतीय संविधानाची लक्तरे तोडली जातं आहेत. लोकशाही संपवत आहेत, अश्यावेळी कोणीच माईचा लाल विरोध करत नाही. कारण या लोकांनी विरोधक पण संपवला आहे

 

मनुवादी पिलावळ सत्तेच गाजर दाखवून गुलाम बनवून दलित व बौद्धाना विविध कार्यक्रमाचे अमिश देऊन. बौद्ध परिषदा व जयंत्या साजऱ्या करून बनावट बौद्ध धम्मगुरूंना हाताशी धरून मतांचे राजकारण करत आहेत. यामध्ये दलित / बौद्ध समाजाचे दारूडे कार्यकर्ते तर काहीना पैशे देऊन विकत घेतले आहे. अश्या गद्दारांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे.

 

भाजपाच्या वाटेवर किंवा त्यांच्यात सामील झालेल्या किंवा हजेरीवर पैसे घेऊन प्रचार करणाऱ्या मित्र आपटेष्ठा चे मत परिवर्तन करून आंबेडकरी चळवळीशी गद्दारी करु देऊ नका आणि जर आंबेडकरी चळवळीतून राजगृहाला बेईमान होऊन मनुवादी विचार पेरण्यास त्यांना सत्तेत आणण्यास मदत करत असेल तर अश्या दांभीक वृत्ती आणि प्रवृत्तीना जागीच ठेचून काढण्याचे आवाहन विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकनिकर यांनी केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 13, 2024   

PostImage

दिल्लीचे लक्ष्य आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी फोडण्याकडे


मुंबई : पश्चिम बंगाल, पंजाब बिहारमध्ये सुद्धा भाजपच्या मनासारख्या घटना घडून इंडिया आघाडीची शकले पडत असताना आता दिल्लीचे लक्ष्य महाराष्ट्राकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी फोडण्याचे डावपेच आखले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांना हाताशी धरून उध्दव आणि पवारांच्या शिल्लक आमदारांना सुद्धा भाजपमध्ये आणायचे आणि नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते गळाला लावून उरल्या सुरल्या आघाडीला सुरुंग लावण्याची तयारी सुरू आहे.

 

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वेगळी चूल मांडल्याने भाजपमध्ये सध्या खुशीचे वातावरण आहे. राममंदिर आणि कलम ३७० मुळे २०२४ मध्ये आमचा विजय निश्चित झाला असून आम्हाला आता वेध लागले आहेत ते २०२९ असा भाजपचा सध्या प्रचार प्रसार सुरू आहे. मात्र भाजप हा देशात असा एकमेव पक्ष आहे जो वर्षाचे ३६५ दिवस फक्त राजकारण करतो. आपल्या विरोधकांना किंचितही मोकळीक राहता कामा नये, असा विचार करत असतो.याच मुळे आता त्यांनी महाराष्ट्रात आघाडीची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे मिशन यशस्वी होताना दिसत नसल्याने भाजप पक्षश्रेष्ठी अस्वस्थ आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचा तसेच भाजप आणि खासगी यंत्रणांचा अहवाल हा भाजपचे मिशन यशस्वी होत नसल्याचे सांगत आहे. महाविकास आघाडी ४८ पैकी किमान २५ ते ३० जागा मिळवतील, असा अंदाज सांगितला जात आहे. उध्दव ठाकरे यांची सहानभुती कायम असून शरद पवार आपले सारे कसब पणाला लावत आहेत. काँग्रेस सुद्धा अजून डळमळीत झालेली नसल्याने भाजपचे निवडणूक रणनीतिकार नवीन चाल खेळण्याचे डावपेच आखत आहेत. उध्दव ठाकरे यांना यापुढे कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळवू द्यायची नाही आणि यासाठी भाजप नेते तसेच प्रवक्ते यांनी मातोश्रीवर आधी सडकून टीका करणे बंद करावी, असे आदेश निघाले आहेत. यामुळे गेले काही महिने सतत टीकेचा आसूड घेऊन उभे असलेले नारायण राणे आणि त्यांची दोन चिरंजीव निलेश आणि नितेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना सध्या थोडे शांत बसण्यास सांगण्यात आल्याचे कळते. यामुळे गेले काही  महाराष्ट्रातील.. उध्दव आणि आदित्य यांच्यावर होणारी टीका आता कमी झाली आहे. याबरोबर किरीट सोमय्या सुद्धा शांतचित्त झाल्याचे दिसत आहे.

 

टीकेच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेताना तपास यंत्रणा मात्र आघाडीची कोंडी करताना दिसत आहेत. आमदार रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून अनिल परब, संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना अटक झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनप्रकरणी चौकशीला बोलावले जाऊ शकते. आदित्य यांना अटक केली तर राज्यात मातोश्रीला निवडणुकीत आणखी फायदा होईल, या शक्यतेने फक्त चौकशीचा फास फेकण्याचा विचार केला जात आहे, असे समजते.

 

दुसऱ्या बाजुला रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर आता पवारांचे आणखी कोण नेते चौकशीच्या रडारवर आणता येतील आणि कोण फुटू शकतील, याचा सुद्धा भाजपकडून विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा भाजपने आशा सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय काँग्रेसचे नेते आपल्या बाजूने वळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासयासह निवडणुकीच्या तोंडावर काही महत्वाचे काँग्रेस नेते आपल्याकडे येतील, यासाठी भाजपडावपेच आखत असल्याचे कळते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024   

PostImage

आपल्याकडे आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे - संस्थाध्यक्ष अरविंद …


 

 

*मंदार कृषी तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

 

*प्रतिनिधी : दिलीप अहिनवे*

 

मुरबाड, दि. २६ : मुरबाड तालुक्यातील कोळींब गावातील मंदार कृषी तंत्र विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

          कार्यक्रमाला पाहुणे म्हणून श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोटे, संस्थेच्या उपाध्यक्षा विजयाताई पोटे, कल्याण मधील डॉ. अभिजीत शिंदे, स्थानिक उपसरपंच संकेश पाठारे, प्राचार्या निलाक्षी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भुषण गायकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव, शिवसेना कार्यकर्त्या राजलक्ष्मी अंगारखे, माजी सरपंच कृष्णा राऊत, उद्योजक मोहन राऊत, विद्यार्थी व सर्व शिक्षक हे उपस्थित होते.

         

संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बासरी व बिगुल वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांनी चांगल्याप्रकारे शिकवले व विद्यार्थ्यांची इच्छा असली तर रिझल्ट काय असतो हे उत्तम बासरी वाजवुन विद्यार्थिनींनी आम्हाला दाखवुन दिले. आपले हे ॲग्रीकल्चर कॉलेज आहे. मुले दहावी पास झाली की, त्यांना शेती करण्यास कमीपणा वाटतो. शेती मालाला बाजारभाव कमी मिळाला की, शेतकरी नाराज होतात. परंतु शेतीत प्रगती केली तर भविष्य चांगले आहे. सध्या परदेशात व आपल्या देशात शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करत आहेत. भातशेती करायला येथील शेतकरी तयार नसतात. खर्च भरपुर परंतु त्यामानाने उत्पन्न कमीच मिळते. 

          कल्याण मधील एका संस्थेने मागील वर्षी आपल्या कॉलेजमधील १८ विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर काम केले. सन २०१२ च्या बॅचमधील चंद्रकांत पष्टे हा विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. आपल्याकडे आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. करता येण्याजोगे चांगले व्यवसाय भरपुर असतात ते करताना आपल्याकडे इच्छा हवी. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यात काही तरी चांगले करायचे आहे असा निश्चय करुया. आपण यशस्वी व्हायचे आहे. आपल्या जोडीदाराला देखील सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.

         कल्याण मधील डॉ अभिजीत शिंदे यांनी सांगितले की, आज आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आपल्या संविधानात न्याय, समता, एकता व बंधुता या चार घटकांचा समावेश होतो. ही चतु:सूत्री अंमलात आणण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक म्हणजे असे राज्य की, जेथे लोकांचा प्रतिनिधी लोकांमधुन जातो आणि तो लोकांसाठी सेवा तसेच कार्य करतो. म्हणून भारत हा प्रजासत्ताक देश आहे. भारतात आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. भारताची आणि आपल्या प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याची संधी त्याला मिळते. आजच्या दिवशी आपण एक निश्चय करुया की, ही चतु:सुत्री अंमलात आणु. या चतु:सुत्रीचा कोठेही अवमान होऊ देणार नाही याची निश्चित स्वरुपाची काळजी घेऊ. एकमेकांच्या सहाय्याने आमच्या राष्ट्राचे कल्याण कसे होईल याचा विचार करु. तुम्ही आज छान पद्धतीने संविधानाचे वाचन केले आहे. आपण प्रत्येकाने संविधान आत्मसात करावे अशी आशा व्यक्त करतो.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024   

PostImage

मंत्रिमंडळ निर्णय


राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर ५ रुपये  इतके अनुदान देण्यात येईल

सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान २७ रुपये  प्रति लिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पध्दतीने (ऑनलाईन) देणे  बंधनकारक राहील. तद्नंतर, शेतकऱ्यांना शासनामार्फत  ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग (डीबीटी) करण्यात येईल.

फॅट व एसएनएफ ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति पॉईन्ट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करीता प्रत्येकी ३० पैसे वजावट करण्यात येईल. तसेच प्रति पॉईन्ट वाढीकरीता ३० पैसे वाढ करण्यात यावी.

सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दुध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे देणेबाबत मान्यता देण्यात येत आहे.

नोव्हेंबर, २०२३ मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत होणारे दुध संकलन १४९ लाख लिटर प्रतिदिन इतके आहे. प्रस्तावित रू.५/- प्रतिलिटर अनुदानप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरीता अंदाजित रू.२३० कोटी इतके अनुदान आवश्यक राहील. तथापि, प्रत्यक्ष होणाऱ्या दुध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे.

योजना ११ जानेवारी, २०२४ ते १० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीकरीता राबविण्यात येईल.